Home / Marathi Quotes / Motivational Quotes in Marathi |...

Motivational Quotes in Marathi | 100+ प्रेरणादायी विचार मराठी मध्ये !

By Hindi Shayari 18 Jun 2026 10:10 PM

Motivational Quotes in Marathi: निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते. बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात. परंतु, जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरवात होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशन ची कमतरता. आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशन ची खूप गरज असते म्हणूनच आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स जे आपले जीवन बदलतील.

Powerful Motivational Quotes in Marathi

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल तर नक्किच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका, कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते, नवीन काहीतरी सुरु होण्याची.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही.

नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

प्रेरणादायक मराठी कोट्स

ज्याच्याजवळ उमेद आहे, तो कधीही हरू शकत नाही.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.

वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही शेवटी पानांनीही साथ सोडली पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.

खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला “कमजोर” समजत असेल..

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.

अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रेरणादायक कोट्स

रुद्राक्ष असो किंवा माणूस खुप अवघड असत एकमुखी भेटणं.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका, उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही.

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

कठीण प्रसंगात पुढे जाण्यासाठी प्रेरणादायक मराठी विचार

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय.

गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीच कारण बनायचं.

चांगल्यातुन चांगले निर्माण होते वाईटातून वाईट.

आयुष्यात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

आपल्याला हे मोटिवेशनल कोट्स आवडले असतील तर जरूर आपल्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा!

Written By

Hindi Shayari

SerialKhabar team aapko latest TV serial updates, spoilers aur entertainment news provide karti hai.