जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा Love Quotes in Marathi संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल। ११०० पेक्षा जास्त प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार च्या मदतीने आपले प्रेम व्यक्त करा.
Latest Heart Touching Love Quotes in Marathi
जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,
फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,
काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,
त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.
प्रेम म्हणजे,
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.
मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे.
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
प्रेमाची खरी भावना व्यक्त करणारे लव्ह कोट्स
जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते.
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.
कविता चुकली तर कागद फडता येतो
पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.
गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस.
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.
प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.
प्रेमाची गोडी व्यक्त करणारे विचार
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.
तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधीही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय.
तुझ्याशिवाय जगणं काय
जगण्याचं स्वप्नंसुद्धा पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो,
पण तुझ्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही.
सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,
सुटता सुटेना..
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना.
आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम.
आशा करते हैं की हे Love Quotes in Marathi तुम्हाला आवडले असतील। तुमच्या प्रेमाला शब्द द्या आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवा। जर आणखी हवे असतील तर कमेंट करा!