कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता व कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी Life Status in Marathi चा संग्रह आपल्याला मदत करेल. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने Life Status in Marathi हा संग्रह वाचायला हवा.
Best Latest Life Status in Marathi प्रेरणा देणारे जीवनाचे विचार
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे, समोरच्यावर टीका करणं.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही.
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते.
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या, व अपमान करणाऱ्या, लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं.
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.
जीवनाला नवा अर्थ देणारे विचार Life Quotes in Marathi
पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात, आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटच चुकते, प्रवासाची दिशाच बदलून जाते कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत.
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून, त्याच्या भविष्याची टर उडवू नका. कारण, काळ इतका ताकदवान आहे कि, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिऱ्यात बदलतो.
उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.
ज्याने स्वत:चं मन जिळकलं त्याने जग जिळकलं.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.
दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं कि समजावं, आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे.
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
आशा करते हैं की ये Life Status in Marathi तुम्हाला आवडले असतील. जीवनाला नवा अर्थ द्या! जर आणखी हवे असतील तर कमेंट करा!