प्रेम म्हणजे प्रेम असतं; पण नेमकं काय असतं? मित्रानो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ११०० पेक्षा जास्त मराठी लव्ह शायरीचा संग्रह. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी व आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी या मराठी लव्ह शायरी Love Shayari in Marathi च्या मदतीने आपण आपल्या प्रियकर, प्रेयसी च्या हृदयात एक खास जागा बनवू शकाल.
Latest Marathi Love Shayari प्रेम व्यक्त करणारी हृदयस्पर्शी शायरी
जीव तयार आहे तुझ्यासाठी, गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना? मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना?
जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल, रात्रभर नाही, पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.
कुणीतरी असावं, गालातल्या गालात हसणारं.. भरलेच आसवांनी, तर डोळे पुसणारं.. कुणीतरी असावं, आपलं म्हणता येणारं.. केलं परकं जगानं, तरी आपलं करून घेणारं.
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.
आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात … पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा खुप वेळ असेल तुमचाकडे. आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा कविता नुसत्याच नाही सुचणार त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल.
अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे, समजून न घेता काय ते प्रेम करणे, खूप सोपे असते कुणीतरी आवडणे, पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.
रोमँटिक प्रेम शायरी मराठीत
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता, आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून, देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता, पण ती तुम्हाला भेटत नाही, तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करतंय, आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की प्रेमात पडावे. कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला प्रेम म्हणायचं असत. भविष्याची स्वप्न रंगवत आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.
या जगात प्रेम तर सर्वच करतात, प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण, सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण, काढशील आठवण माझी जेव्हा, अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.
फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस, विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस, हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट. आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.
प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही त्याला प्रेम कधीच उमजत नाही.
जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.
प्रेमाची खरी भावना व्यक्त करणारी शायरी
तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो, निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो, असे का बरे होते हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो.
तुच माझी रूपमती, सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती, म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती, कधी बनशील तु माझी सौभाग्यवती.
प्रेम सर्वांवर करा, पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा, ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.
आपले प्रेम हे एक फुल आहे, ज्याला मी तोडू शकत नाही, आणि सोडूही शकत नाही, कारण तोडले तर सुकून जाईल, आणि सोडले तर, दुसरा कोणी घेऊन जाईल !
जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले… तर, मग दुसरं प्रेम निवडा, कारण, जर तुमचे पहिले प्रेम खरे असते तर.. दुसरे प्रेम झालेच नसते !
Also Read:
- Love Status in Marathi
- Love Quotes in Marathi
आशा करते हैं की ये Love Shayari in Marathi तुम्हाला आवडली असतील. तुमच्या प्रेमाला शब्द द्या! जर आणखी हवे असतील तर कमेंट करा!