Advertisement
Advertisement

Love Status in Marathi | 100+ लव्ह स्टेटस मराठी

जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा Love Status in Marathi संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल. लव्ह स्टेटस मराठी च्या मदतीने आपल्या प्रेमाच्या भावना अनोख्या अंदाजात व्यक्त करा व आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीला जाणवून द्या कि तुम्ही किती रोमँटिक आहात.

Latest Best Marathi Love Status रोमँटिक लव्ह स्टेटस मराठीत

तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस.

ओढ म्हणजे काय ते,
जीव लागल्याशिवाय समजत नाही.
विरह म्हणजे काय ते,
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
प्रेम म्हणजे काय ते,
स्वतः केल्याशिवाय समजत नाही.

गालावर खळी नको तिच्या,
फक्त जरा हसरी मिळावी..
चंद्राइतकी सुंदर नकोच,
फक्त परी लाजरी मिळावी.

हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे.

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल.

नदीला या काठ दे..
वाटेला माझ्या वाट दे..
अडकलाय गं तुझ्यात जीव माझा,
आता फक्त आयुष्यभराची साथ दे.

कुठे जाणार सोडून तुला,
जिव माझा तूच आहेस,
कोणी काहीही म्हणू दे,
माझ्या मनात तूच आहेस.

माणूस मनापासून खुश फक्त,
त्याच व्यक्तीसोबत राहु शकतो..
ज्याच्यावर तो प्रेम करत असतो.

तु माझ्या नशिबात आहेस कि नाही,
हे मला माहित नाही पण,
तु जोपर्यंत माझ्या हृदयात आहेस,
तोपर्यंत मी देवाकडे फक्त तुलाच मागेन.

तुला रडवायचं आहे तितकं रडव,
पण साथ सोडू नको..
कारण मी रडायला तयार आहे,
पण तुझी साथ सोडायला नाही.

तु मला विसरशील हा,
माझ्या आयुष्यातील दुःखाचा दिवस असेल.
पण मी तुला विसरेन हा,
माझ्या जीवनातील शेवटचा दिवस असेल.

ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला,
काही सांगायचंय तुला,
एकही क्षण ही करमत नाही मला..
म्हणून ठरवलंय आता,
बायको बनवायचंय तुला.

तुझ्या आयुष्यात माझी जागा,
घेणारे लाखो तुला भेटतील..
पण, माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारी,
फक्त तू एकटीच असशील.

कोणाला मिळवणे याला
प्रेम म्हणत नाहीत तर
कोणाच्या तरी मनात आपली
जागा निर्माण करणे म्हणजेच
तर खरे प्रेम.

प्रेम व्यक्त करणारे हृदयस्पर्शी स्टेटस

तूच माझी रूपमती,
सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती,
म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती,
कधी बनशील तु माझी सौभाग्यवती.

प्रेम सर्वांवर करा,
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.

आपले प्रेम हे एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडूही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल,
आणि सोडले तर, दुसरा कोणी घेऊन जाईल !

जर कधी आयुष्यामध्ये
तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले…
तर, मग दुसरं प्रेम निवडा,
कारण,
जर तुमचे पहिले प्रेम खरे असते तर..
दुसरे प्रेम झालेच नसते !

तुझा होतो तुझा आहे,
आयुष्यभर तुझाच राहीन..
तु परत यायचं वचन दे,
मी उभा जन्म वाट पाहीन.

मी “तुझी” आहे का नाही..
“हे मला नाही माहीत..”
पण,
“तू” “फक्त” आणि “फक्त”
“माझा” आहेस हे लक्षात ठेव”.

प्रेमात जीव द्यायचा नसतो,
प्रेमात जीव घ्यायचा नसतो,
प्रेमात तर जोडीदाराला,
जीव लावायचा असतो.

जो व्यक्ती खूप भांडणे करूनही
तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.
समजून जा कि तोच व्यक्ती,
तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो.

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.

तुला हसवण्यापेक्षा,
तुला रडवणे, मला पसंत आहे..
मिठीत घेऊन तुला समजावण्यात,
एक वेगळाच आनंद आहे !

कधीतरी त्यांना पण
साथ देऊन बघा ज्यांचं हृदय,
आधीच कोणीतरी तोडलं आहे..
ते आयुष्यात तुम्हाला,
कधीच नाही सोडणार.

प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण जगू शकत नाही.

Also Read:

  • Love Quotes in Marathi
  • Motivational Quotes in Marathi

आशा करते हैं की हे Love Status in Marathi तुम्हाला आवडले असतील. तुमच्या प्रेमाला शब्द द्या आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवा! जर आणखी हवे असतील तर कमेंट करा!

Written By

Hindi Shayari

SerialKhabar team aapko latest TV serial updates, spoilers aur entertainment news provide karti hai.